dailyvideo

.

भारत केंद्रीत शांती चर्चा मान्य नाही : मुशर्रफ

स्रोत: तरुण भारत
इस्लामाबाद, २ ऑक्टोबर - अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या प्रक्रियेत पाकिस्तानकडे दुर्लक्ष करत भारताला महत्त्व देण्यात येत आहे, असा दावा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केला असून, ही बाब इस्लामाबाद कदापि मान्य करणार नाही हे अमेरिकेने समजून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेतून भारताच्या बाजूने झुकणारा कुठलाही निर्णय पाकिस्तान कधीही मान्य करणार नाही, असे सध्या लंडन येथे राजकीय विजनवासात राहात असलेल्या मुशर्रफ यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानने शक्य त्या सर्व आंतरिक आणि बाह्य स्त्रोतांचा वापर करण्याची गरज आहे, असे ६८ वर्षीय मुशर्रफ यांनी एक्सप्रेस २४ बाय ७ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या बाबतीत अमेरिका आणि पाकिस्तान हे दोघेही एकाच बाजूला असणे आवश्यक आहे. असे न होता अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता कायम राहिल्यास १९९० च्या काळात तत्कालिन सोव्हिएट युनियनची जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. पाकची आयएसआय ही गुप्तचर संस्था अफगाणिस्तानमध्ये गनिमी युद्ध करत असल्याच्या अमेरिकेने नुकत्याच केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असता मुशर्रफ म्हणाले की अमेरिका आपले अपयश लपविण्यासाठी पाकिस्तानला बळीचा बकरा बनवत आहे. हक्कानी गटाचा सफाया करणे ही अमेरिका आणि पाकिस्तानची संयुक्त जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

Posted by Admin on 9:15 AM. Filed under , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for भारत केंद्रीत शांती चर्चा मान्य नाही : मुशर्रफ

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery