dailyvideo

.

'धूम-३'मध्ये कतरिना कैफ

नवी दिल्ली: 'धूम-३' या चित्रपटामध्ये प्रमुख नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसणार असून अभिनेता अमिर खानच्या बरोबर तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी दिली.
'यश राज फिल्म्स'च्या 'धूम' चित्रपटाचे पहिले दोन भाग चांगलेच गाजले होते, आता या तिसऱ्या भागात अमिर खानसारखा निवडक चित्रपट करणारा अभिनेता घेऊन नवीन चित्रपटाचीही पायाभरणी जोरात झाली आहे. त्यात आणखी सध्या लोकप्रियतेच्या जोमात असलेल्या कतरिनाला घेऊन हा चित्रपटही तिकीट खिडकीवर उत्साह आणेल अशी चिन्हे आहेत.
सुरुवातीला निर्माते आदित्य चोप्रा व दिग्दर्शक आचार्य यांना 'धूम-३'मध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा हवा होता, परंतु खूप शोध घेतल्यानंतर त्यांनी कतरिनाचेच नाव निश्चित केले. नुकताच कतरिनाचा 'मेरे ब्रदर की दुल्हन' हा 'यश राज'च्या बॅनरखालचा चित्रपट प्रदर्शित झाला.
'जेव्हा नवीन चेहरा घ्यायचा नाही असे ठरले तेव्हा आमचा पहिला पर्याय कतरिनाच होती. तिच्यामुळे चित्रपटात प्रचंड उत्साह आणि जबाबदारीची जाणीव येईल याची आम्हाला खात्री आहे.
यापूर्वी धूम (२००४) व धूम-२ (२००६) या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला होता. 'धूम-३'मध्ये अभिषेक बच्चन व उदय चोप्रा यांची पोलिसी जोडी कायम असून चोराची भूमिका अमिर खानकडे आली आहे नि चोराची साथीदार असणारेय कतरिना कैफ.

Posted by Admin on 9:17 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for 'धूम-३'मध्ये कतरिना कैफ

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery