dailyvideo

.

गोलंदाजांचा समाचार घेण्यात सेहवाग सचिनपेक्षा श्रेष्ठ : कपिल देव

गोलंदाजांचा समाचार घेण्यात सेहवाग सचिनपेक्षा श्रेष्ठ : कपिल देव
स्रोत: तरुण भारत
मुंबई, २ ऑक्टोबर - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विक्रमावर विक्रम करीत असला, तरी गोलंदाजांवर तुटून पडण्यात सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग अधिक श्रेष्ठ असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने व्यक्त केले. सेहवाग हा सुरुवातीपासून गोलंदाजांचा समाचार घेण्यास सज्ज असतो, असेही कपिल म्हणाला. येथील एका कार्यक्रमात कपिलदेव बोलत होता. तो म्हणाला, प्रत्येक खेळाडूची फलंदाजी करण्याची एक विशेष शैली असते. कपिलदेव म्हणाला की, सचिन तेंडुलकरपेक्षा सेहवाग चांगल्या गोलंदाजांवर नेहमीच सुरुवातीपासून तुटून पडत असतो. सेहवागच्या तुलनेत राहुल द्रविड आणि सचिन यांच्या फलंदाजीत आक्रमकता दिसत नाही. सेहवाग जितका आक्रमक आहे, तितकाच धोनीही आहे. तोही गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. चौकार व षटकार खेचण्यात हे दोघेही गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूवर तुटून पडतात आणि त्यातच त्यांची आक्रमकता दिसून येते, असेही कपिलदेवने बोलून दाखविले. इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघाचे जे पानिपत झाले, त्याला बीसीसीआयचे धोरण जबाबदार असल्याचा टोला कपिलदेवने यावेळी हाणला. वास्तविक युवा खेळाडूंना संघात स्थान द्यावयास हवे, असे मत त्याने मांडले. बीसीसीआयची अनेक धोरणे चुकीची आहेत, असे सांगून कपिलदेव म्हणाला की, खेळाडू देशाकडून खेळण्यापेक्षा अधिक पैसा मिळणार्‍या आयपीएलकडे आकर्षित होतात. त्यामुळे या सर्वाला बीसीसीआयच दोषी असल्याचे कपिलदेवने शेवटी बोलून दाखविले.

Posted by Admin on 9:18 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for गोलंदाजांचा समाचार घेण्यात सेहवाग सचिनपेक्षा श्रेष्ठ : कपिल देव

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery