dailyvideo

.

'फेसबुकद्वारे कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन

न्यूयॉर्क -  'तुमचा बॉस जर 'फेसबुक'वर तुमच्या 'फ्रेंडलिस्ट'मध्ये असेल, तर कुठलेही 'स्टेटस अपडेट' करताना किंवा फोटो 'अपलोड' करताना सावधगिरी बाळगा' असा सल्ला दिला जातो. पण अमेरिकेमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये मात्र याच्या उलट निष्कर्ष समोर आला. 'फेसबुक'वर असलेला आपला कर्मचारी किती मोकळेपणाने 'झळकत' असतो, त्यावरून मालकांना त्याच्या कामाचे योग्य मूल्यमापन करता येऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
कामामध्ये मिळणारे यश आणि त्यांची 'फेसबुक प्रोफाइल' यामध्ये नक्कीच काही संबंध असतो, असे या संशोधकांचे मत आहे. एखाद्या पार्टीमधील छायाचित्रे "अपलोड' करण्यामध्ये काहीही गैर नाही; उलट यामुळे मालकाची खात्री पटते, की आपला कर्मचारी मिळून-मिसळून वागणारा आणि खुल्या मनाचा आहे, असे संशोधकांना आढळले. एलिनॉईस विद्यापीठ, एव्हान्सविल विद्यापीठ व ऑबर्न विद्यापीठ यांनी हे सर्वेक्षण केले. विद्यापीठातील एक प्राध्यापक आणि दोन विद्यार्थ्यांनी नोकरीला सुरवात केलेल्या 56 विद्यार्थ्यांच्या "फेसबुक प्रोफाइल'वर आणि नोकरीतील प्रगतीवर लक्ष ठेवले होते. यासाठी त्यांनी प्रत्येक "प्रोफाइल'चे प्रत्येकी दहा मिनिटे निरीक्षण करून छायाचित्रे, "कॉमेंट्‌स', मित्र आणि छंद याची माहिती घेतली. त्यानंतर "त्या' विद्यार्थ्याची विश्‍वासार्हता किती आहे, तो भावनिकदृष्ट्या किती स्थिर आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर सहा महिन्यांनी त्याच विद्यार्थ्यांच्या नोकरीतील वरिष्ठांकडून झालेल्या मूल्यांकनाशी "फेसबुक'वरील पाहणीचे निष्कर्ष पडताळून पाहण्यात आले. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, कामातील प्रगती करणाऱ्यांना "फेसबुक'च्या पाहणीमध्येही चांगले शेरे मिळाले होते. इतकेच नाही, तर एखादा मालक आपल्या कर्मचाऱ्याच्या "फेसबुक'वरील खात्याचा "पासवर्ड'ही मागू शकतो, असेही त्या पाहणीत आढळले.
सर्वेक्षणानुसार, विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाने जवळपास 70 टक्के वेळा उमेदवाराची "फेसबुक'वरही पाहणी केली असून, तेथे नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्या उमेदवाराला नाकारले आहे.
- उमेदवाराची "सोशल नेटवर्किंग साईट्‌स'वरील वर्तणूक तपासण्याचे कंत्राट इतर कंपन्यांकडे देण्यासही काही ठिकाणी सुरवात
- कायदेशीररीत्या उमेदवाराची जी माहिती मालकाला मूल्यांकनाच्या कामात साह्य करेल, तीच माहिती या कंपन्या देतात.

Posted by Admin on 3:39 PM. Filed under , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for 'फेसबुकद्वारे कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery