dailyvideo

.

महागाई भडकवणारा अर्थसंकल्प-भाजपा

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना बोजा सहन करावा लागणार आहे तसेच भविष्यात महागाई भडकेल अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे................. अर्थसंकल्प निराशाजनक : जसवंत सिंग
    अर्थमंत्री मुखर्जी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अतिशय निराशाजनक आहे. महागाईच्या विळख्यात अडकलेल्या सर्वसामान्यांना सरकार दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. सामान्यांवर सरकारने आणखी आघात केला आहे. महागाईला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री जसवंत सिंग यांनी या अर्थसंकल्पाचा पंचनामा केला. 
‘आम आदमी’चे बजेट नाही : यशवंत सिन्हा
    हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नाहीच. सर्वसामान्यांना दिलासा देणारी एकही तरतूद यात नाही. महागाई, आर्थिक विकासाला गती देणे यासारख्या आव्हानांचा सामना कसा करणार, याबाबतचा कुठलाच उल्लेख या अर्थसंकल्पात नाही. ही मोठी आव्हाने हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले होते, अशी टीका माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली.

सीमाशुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा करांत वाढ केल्याने महागाईचा आणखी भजका उडण्याची शक्यता असल्याचे भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अर्थसंकल्पात भविष्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. तसेच देशाबाहेर जाणा-या पैसा रोखण्यासाठीही कोणतीही ठोस उपायोजना केलेली नाही. भाजपा प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी देखील हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांवर बोज टाकणार असल्याचे सांगितले. या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य जनतेवर एक लाख कोटी रुपयांचा अतिरीक्त बार पडणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढीसाठी कोणताही ठोस उपाययोजना केलेली नाही. उलट उत्पादन कर आणि सेवाकर 12 टक्क्यांवर नेल्याने हा भार अधिकच वाढला आहे.

Posted by Admin on 4:10 AM. Filed under , , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for महागाई भडकवणारा अर्थसंकल्प-भाजपा

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery