खोटा पुरावा : सहकार उपनिबंधकावर गुन्हा
बुलढाणा, (हिं. स.) - तक्रार कर्त्माला न्याय देण्याऐवजी अवैध सावकारालाच वाचविण्यासाठी खोटा पुरावा तयार करण्याचे प्रकरण सहकार खात्यावरच शेकले आहे. या प्रकरणी सहायक निबंधक व सध्या उपनिबंधक सहकारी संस्था दक्षता विभाग पुणे येथे कार्यरत दिलीप तुकाराम भापकर यांच्या विरुध्द न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल झाले आहेत.
सावकाराकडून घेतलेले पैसे परत केल्यानंतरही शेतक-याची नाममात्र दराने घेतलेली जमीन अवैध सावकार परत देण्यास टाळाटाळ करत होता. यामुळे त्रस्त झालेल्या शेगाव येथील भिकाजी वरोकार यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याने सहकार विभागात खळबळ उडाली आहे.
येथील फुले नगर मधील रहिवासी भिकाजी मोतीराम वरोकार यांनी शेगावातीलच पुनीत शंकरलाल धानुका यांचेकडून उसनवारीने पैसे घेतले होते. या कारभारात व्यवहारात वरोकार यांनी नाममात्र दराची जमीन खरेदी करून दिली होती. घेतलेले पैसे परत केल्यानंतरही व्यवहारापोटी कागदोपत्री विक्री केलेली जमीन परत मागीतली असता श्री.धानुका यांनी ती परत दिली नाही.
यावेळी सहायक निबंधक म्हणून शेगाव येथे पगारे व सहकारी अधिकारी म्हणून महेश अर्जुनदास कृपलानी हे कार्यरत होते. यावेळी त्यांनी अवैध सावकार पुनीत धानुका याच्याशी संगनमत करून धानुका यांनी खोट्या स्वाक्षरीची तक्रार केली होती. ती प्रत उपरोक्त अधिकार्यांनी तब्यात घेऊन हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्याच्या नावाखाली घेतली. मात्र वरोकार यांनी चौकशी केली असता अशा आशयाचा कोणताही नमुना हस्ताक्षर तज्ञ नागपूर यांच्याकडे पोचला नव्हता. यावरून वरोकार यांनी शेगाव पोलिस स्टेशनमध्ये पगारे व कृपलानी यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. या तक्रारीची काहीही चौकशी न झाल्याने वरोकार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकार आयुक्त व सहकारी संस्था पुणे यांच्याकडे तक्रारी केल्या. यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी वरोकार यांना लेखी कळविले की, सहकार अधिकारी महेश कृपलानी यांना तुमच्या तक्रारीवरून निलंबित करण्यात आले आहे. मात्र सदर अधिकारी सेवेत कामम होते. मावरून उपनिबंधक कार्मालमाने आपल्माला खोटी माहिती पुरविल्याचा दावा शेगाव न्यायालयासमोर दाखल केला होता.
हिंदुस्थान समाचार /१६.०३.२०१२ /