रेल्वेच्या स्वस्ताईचे दशक संपले
नवी दिल्ली, - तृणमूल कॉंगे्रसचे नेते आणि रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज आपला पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत सादर करताना, सर्वच प्रकारच्या प्रवासी भाड्यात वाढ सुचविली. यासोबतच रेल्वेच्या स्वस्ताईचे दशकही आता संपले आहे. रेल्वे मंत्र्यांनी विविध श्रेणीच्या प्रवासात सूचविलेली ही वाढ प्रति किलोमीटर दोन पैसे ते प्रति किलोमीटर ३० पैशांपर्यंत आहे. रेल्वे मंत्र्यांनी प्लॅटङ्गार्म तिकिटाचा दरही विद्यमान तीन रुपयांवरून पाच रुपये इतका केला आहे. आर्थिक तब्येत नाजूक असलेल्या रेल्वेने ९ वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ जाहीर केली असल्याने सामान्यांच्या खिशाला काही प्रमाणात भुर्दंड बसणार आहे. तर, त्याचवेळी, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज तत्काळ मंजूर केले. संसदेत या प्रस्तावित भाडेवाढीवर चर्चा झाल्यानंतर ती तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. नेहमीप्रमाणेच, या अर्थसंकल्पातही विदर्भाच्या नशिबी भोपळाच आला आहे. रेल्वे मंत्री त्रिवेदी यांनी आपल्या अर्थसंकल्पात, देशात ७५ नव्या एक्सप्रेस गाड्या आणि २१ नव्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची, ३९ गाड्यांचा थांबा वाढविण्याची आणि २३ गाड्यांच्या ङ्गेर्या वाढविण्याची घोषणाही केली. सोबतच २०१२-१३ या वर्षाकरिता त्यांनी रेल्वेची वार्षिक योजना ६०,१०० कोटी रुपये इतका निश्चित केला. आजवरची ही सर्वात मोठी योजना मानली जात आहे. आपला पहिलाच रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना, रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल नऊ वर्षांनंतर सर्वच श्रेणींच्या प्रवास भाड्यात वाढ जाहीर केली. यानुसार, लोकल आणि सामान्य द्वितीय श्रेणीतून प्रवास करणार्यांना प्रति एक किलोमीटर प्रवासासाठी दोन पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे मेल/एक्सप्रेसच्या द्वितीय श्रेणीच्या प्रति किलोमींटर प्रवासासाठी तीन पैसे, स्लीपर श्रेणीच्या प्रति किलोमीटर प्रवासासाठी पाच पैसे, वातानुकुलित चेअर कार, वातानुकुलित थ्री-टायर आणि प्रथम श्रेणीच्या प्रति किलोमीटर प्रवासासाठी दहा पैसे जास्त मोजावे लागणार आहे. वातानुकुलित टू-टायरच्या प्रति किलोमीटर प्रवासाकरिता १५ पैसे आणि प्रथम श्रेणी वातानुकुलित डब्यातून प्रवास करणार्यांना प्रति किलोमीटरसाठी ३० पैसे जादा मोजावे लागणार आहेत. इतकेच काय, तर प्लॅटङ्गार्म तिकीट खरेदी करण्यासाठीही आता दोन रुपये जादा मोजावे लागणार आहे. आधी या तिकिटाचा दर तीन रुपये होता. आता तो पाच रुपये करण्यात आला आहे. आपल्या भाषणात त्रिवेदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांपासून रेल्वेने कुठल्याही प्रकारच्या भाड्यात एक पैशाचीही वाढ केली नव्हती. गेल्या वर्षभरात प्रवाशांची संख्या कमी झाल्याने रेल्वेला मिळणारा महसूलही कमी झाला. यामुळे रेल्वे आर्थिक स्थिती नाजूक झाली. सरकारकडून रेल्वेला पाहिजे तशी मदत मिळत नाही. यातून रेल्वेला काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी दरवाढ करणे अनिवार्य झाले होते. सामान्यांवर जास्त ओझा पडणार नाही, यासाठी मी सर्वच संबंधित नेत्यांशी चर्चा केली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल कॉंगे्रसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मार्गदर्शन घेतले आणि कमीतकमी अशी दरवाढ सूचविली. गेल्या आठ वर्षांच्या काळात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने रेल्वेला जो आर्थिक ङ्गटका बसला आहे, तो या दरवाढीतून पूर्णपणे भरून काढणे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या विकासात माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिलेले योगदान विसरता येणार आहे, अशी पावतीही त्यांनी दिली. रेल्वे मंत्री म्हणाले की, रेल्वेच्या अपघातांमध्ये लोकांचा अमूल्य जीव जाणार नाही, हेच माझे प्राधान्य राहणार आहे. विद्यमान सुरक्षा प्रमाप संतोषजनक नाहीत. यासाठी रेल्वेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वे सुरक्षा प्राधिकरण आणि रेल्वे सुरक्षा निधी स्थापन करण्याचाही आपला प्रस्ताव आहे. पाच वर्षांत मानवरहित रेल्वे ङ्गाटक देशात कुठेही राहणार नाही, यासाठी आपले प्रयत्न राहतील. निधीची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे. भारतीय एकतेचे प्रतिक असलेल्या रेल्वेचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. कारण, रेल्वेच्या विकासातच देशाचा विकास आहे. ‘जान है तो जहान है’, याच अनुषंगाने रेल्वे सुरक्षा निधी आणि रेल्वे संशोधन आणि विकास परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव आपण सादर केला आहे. रेल्वेच्या आधुनिकीकरणात सरकारकडून दहा टक्के अनुदान मिळावे, अशी आपली अपेक्षा आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधा अद्ययावत करण्यावरही आपला भर राहणार आहे. २.५० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. आगामी दहा वर्षात किमान १४ लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे. रेल्वेच्या मजबुतीकरणानेच देश मजबूत होईल, यावर आपला ठाम विश्वास असल्याने, सीमावर्ती राज्यांमध्येही रेल्वेचे जाळे अद्ययावत करण्यात येणार आहे. प्रवासी सुविधांसाठी २०१२-१३ या वर्षात १११२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात ही तरतूद ७६२ कोटी रुपये इतकी होती. रुळांची कमतरता भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असले, तरी देशात रेल्वे रुळांची कमतरता असल्याने गाड्यांची संख्या वाढविणे कठीण काम आहे. सिग्नल, रुळ, पूल, दूरसंचार व्यवस्था आणि स्थानकांच्या विकासाचा आपला प्रस्ताव आहे, असे त्यांनी सांगितले. रेल्वेला आवश्यक असलेली अर्थसंकल्पीय तरतूद देशाच्या अर्थसंकल्पात होत नाही, अशी खंत व्यक्त करताना ते म्हणाले की, रेल्वेची वाटचाल अतिशय बिकट स्थितीतून सुरू आहे. खर्चात सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली, तर आगामी काळात प्रवाशांना दिलासा देणे रेल्वेला शक्य होणार नाही. रेल्वेला आपले अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. पण, अर्थसंकल्पात प्रत्यक्ष २४ हजार कोटी रुपयांचीच तरतूद केली जाते. विमानतळांच्या धर्तीवर स्थानकांचा विकास त्रिवेदी पुढे म्हणाले की, भारतीय रेल्वेच्या विकासाचा ध्यास आपण धरला आहे. भारतीय रेल्वे स्थानक प्राधिकरण महामंडळ १०० रेल्वे स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करणार आहे. याशिवाय, १९ किलोमीटरच्या रेल्वे रुळांचे आधूनिकीकरणही करण्यात येणार आहे. देशातील ८० टक्के रेल्वे वाहतूक याच रुळांवरून होत असते. त्याचप्रमाणे ११ हजार किलोमीटरचे रुळ बदलण्याची गरज आहे. रेल्वे स्थानक प्राधिकरण महामंडळाच्या या प्रकल्पात ५० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या समाप्तीपर्यंत देशातील सर्वच मीटर गेज आणि नॅरो गेज रुळांचा विस्तार करून त्यांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहेत. तीन हजार किलोमीटरच्या रुळांवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असून, डबल डेक्कर मालगाडी सुरू करण्याचाही आपला प्रस्ताव आहे. याशिवाय, अपघात रोखण्यासाठी आधूनिक डबे तयार करण्यावर काम सुरू करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतरही डबे रुळावरून घसरणार नाही, असे डबे तयार करण्यात येणार आहेत. इंजिन आणि डबे बदलविण्यात येणार आहेत. चार नव्या रेल्वे कोच टर्मिनल्सचाही प्रस्ताव आहे. ४५ नवे रुळ ७०० किलोमीटर लांबीचे ४५ नवे रेल्वे रुळ देशात चालू वर्षातच तयार करण्यात येणार असून, यावर ६८७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच १४ नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणही सुरू करण्यात येणार आहे. शताब्दी एक्सप्रेसची गती वाढविणे, १९ हजार किलोमीटरचे रुळ अद्ययावत करणे, लांब अंतराच्या गाड्यांना ९ ते १२ हजार अश्वशक्तीचे इंजिन बसविणे, ८०० किलोमीटर रुळांचे रुंदीकरण करणे, ११०० किलोमीटर रुळांचे विद्युतीकरण करणे आदी योजनाही रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केल्या. नवी मुंबई उर्वरित देशाशी जोडणार नवी मुंबईला उर्वरित देशाशी जोडण्याची घोषणा करतानाच, मुंबई लोकलमध्ये १५०० नवे डबे जोडण्याचा आणि हार्बर रुणावर १२ डब्यांची गाडी चालविण्याचा प्रस्तावही त्यांनी जाहीर केला. मुंबई-पणवेल येथे रेल कोचींग इन्स्टिट्युट स्थापन करण्यात येणार असल्याची आणि सीएसटी-कल्याण दरम्यान नवा रेल कॉरिडोर स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांकरिता स्वतंत्र गाडी सोडण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे सांगतानाच, गरीब रथात अपंगांना विशेष डबा जोडण्यात येणार असल्याचे आणि ऍनेमिया व सिकलसेलच्या रुग्णांकरिता प्रवास भाड्यात सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन पुरस्कार विजेत्यांसाठी मोङ्गत प्रवासाची सोय राहणार आहे, असे जाहीर करताना ई-तिकिटासाठी यापुढे प्रिंट असणे आवश्यक राहणार नाही. एसएमएसही पुरेसा ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ठळक वैशिष्टे
ठळक वैशिष्टे
सर्वच श्रेणीचा प्रवास महागला
९ वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ
प्लॅटङ्गार्म तिकीटही महागले
२१ नव्या पॅसेंजर गाड्या
७५ नव्या एक्सप्रेस गाड्या
८५ नव्या लाईन्सचा प्रस्ताव
ई-तिकीटसाठी केवळ एसएमएसच पुरेसा
३६ गाड्यांवर सेटलाईटने नजर
रेल्वेला तीन हजार कोटींचे कर्ज तात्काळ मंजूर
नवीन एक्सप्रेस गाड्या
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज संसदेत सादर केलेल्या आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात ७२ नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा केली. यात दोन डबल डेकर रेल्वे गाड्या आणि शताब्दी एक्सप्रेसचा समावेश आहे. यात,
१) कामाख्या-लोकमान्य टिळक (टी) वातानुकुलित एक्सप्रेस (आठवडी) मार्गे कटिहार, मुगलसराय, इटारसी.
२) सिकंदराबाद-शालीमार वातानुकुलित एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विजयवाडा.
३) बांद्रा(टी)-भुज वातानुकुलित एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा)
४) दिल्ली सराय रोहिला-उधमपूर वातानुकुलित एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे अंबाला, जालंधर.
५) कोईम्बतूर-बिकानेर वातानुकुलित एक्सप्रेस (आठवडी) मार्गे रोहा, वसई रोड, अहमदाबाद, जोधपूर
६) काकिनाडा-सिकंदराबाद वातानुकुलित एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा)
७) यशवंतपूर-कोछवेली वातानुकुलित डबल डेक्कर एक्सप्रेस (आठवडी)
८) चेन्नई-बेंगलुरू वातानुकुलित डबल डेकर एक्सप्रेस (दररोज)
९) हबिबगंज-इंदूर वातानुकुलित डबल डेकर एक्सप्रेस (दररोज)
१०) हावडा-न्यू जलपायगुडी शताब्दी एक्सप्रेस (आठवड्यातून सहा दिवस) मार्गे माल्दा शहर
११) कर्नाटक-तेजपूर इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज)
१२) तिरुचिरापल्ली-तिरुनेलवेली इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज) मार्गे मदुराई, विरुदूनगर.
१३) जबलपूर-सिंग्रौल इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज)
१४) बिदर-सिकंदराबाद इंटरसिटी एक्सप्रेस (आठवड्यातून सहा दिवस)
१५) कानपूर-अलाहाबाद इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज)
१६) छपरा-मडवाडिह इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज) मार्गे फेफना, रासरा, मऊ
१७) रांची-दुमका इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज) मार्गे देवघर
१८) बारबिल-चक्रधरपूर इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज) मार्गे डोणगावपोसी, झिंकपानी
१९) सिकंदराबाद-बेलमपल्ली इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज) मार्गे काझीपेट
२०) न्यू जलपायगुडी-न्यू कूचबिहार इंटरसिटी एक्सप्रेस (आठवड्यातून पाच दिवस)
२१) अहमदाबाद-अजमेर इंटरसिटी एक्सप्रेस (दररोज)
२२) दादर (टी)-तिरुनेलवेली एक्सप्रेस (आठवडी) मार्गे रोहा, कोईम्बतूर, इरोड
२३) विशाखापट्टनम्-चेन्नई एक्सप्रेस (आठवडी)
२४) विशाखापट्टनम्-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विजयवाडा, मनमाड
२५) इंदूर-यशवंतपूर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे इटारसी, नरखेड, अमरावती, अकोला, काचिगुडा
२६) अजमेर-हरिद्वार एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे दिल्ली
२७) अमरावती-पुणे एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) मार्गे अकोला, पूर्णा, लातूर
२८) काचिगुडा-मदुराई एक्सप्रेस (आठवडी) मार्गे धर्मवरम्, पकाला, जोलारपेट्टाई
२९) बिकानेर-पुरी एक्सप्रेस (आठवडी) मार्गे जयपूर, कोटा, कटनी, मुरवाडा, झार्सुगुडा, संबलपूर
३०) सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेस (आठवड्यातून दोनवेळा) मार्गे बल्लारशा, झारसुगुडा, राऊरकेला, रांची
३१) बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस (आठवडी) मार्गे असानसोल, झाझा
३२) हावडा-रक्सौल एक्सप्रेस (आठवड्यातून दोनवेळा)
३३) भुवनेश्वर-भवानीपटणा लिंक एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विजयानगरम्
३४) पुरी-यशवंतपूर गरीबरथ एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विशाखापट्टनम्, गुंटूर
३५) साईनगर शिर्डी-पंढरपूर एक्सप्रेस (आठवड्याडून दोनवेळा) मार्गे कुर्डूवाडी
३६) भुवनेश्वर-तिरुपती एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विशाखापट्टनम्, गुडूर
३७) विशाखापट्टनम्-लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस (आठवडी) मार्गे तितलागड, रायपूर
३८) हावडा-लालकौन एक्सप्रेस (आठवडी) मार्गे मुघलसराय, वाराणसी, लखनौ
३९) कोलकाता-जयनगर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे असानसोल, झाझा, बारौनी
४०) दिबु्रगड-कोलकाता एक्सप्रेस (आठवडी)
४१) फिरोजपूर-श्रीगंगानगर एक्सप्रेस (दररोज)
४२) जयपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस (आठवडी) मार्गे नागडा, भोपाळ, नरखेड, अमरावती, अकोला
४३) ओखा-जयपूर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पालनपूर, अजमेर
४४) आदिलाबाद-हजुरसाहिब नांदेड एक्सप्रेस (दररोज) मार्गे मुदखेड
४५) शालिमार-चेन्नई एक्सप्रेस (आठवडी)
४६) म्हैसूर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस (आठवडी) मार्गे बंगलोर, धर्मवरम्, बेल्लारी
४७) बलसाड-जोधपूर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पालनपूर, मारवार
४८) पोरबंदर-सिकंदराबाद एक्सप्रेस (आठवडी) मार्गे विरामगम्, वसई रोड
४९) बांद्रा (टी)-दिल्ली सराय रोहिला एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पालनपूर-फुलेरा
५०) हापा-मडगाव एक्सप्रेस (आठवडी) मार्गे वसई रोड, रोहा

५१) बिकानेर-बांद्रा (टी) एक्सप्रेस (आठवडी) मार्गे जोधपूर, मारवार, अहमदाबाद
५२) अहमदाबाद-गोरखपूर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पालनपूर, जयपूर, मथुरा, फर्रूखाबाद, कानपूर
५३) दुर्ग-जगदलपूर एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे तितलागड
५४) मन्नरगुडी-तिरुपती एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे थिरुवारूर, विल्लूपुरम्
५५) गांधीधाम-बांद्रा (टी) एक्सप्रेस (आठवडी) मार्गे मोरबी
५६) कोटा-हनुमान एक्सप्रेस (दररोज) मार्गे जयपूर, बिकानेर
५७) झॉंसी-मुंबई एक्सप्रेस (आठवडी) मार्गे ग्वाल्हेर, माकसी, नागडा
५८) सिकंदराबाद-नागपूर एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे काझीपेट
५९) कानपूर-अमृतस एक्सप्रेस (आठवडी) मार्गे फर्रुखाबाद, बरेली
६०) छपरा-लखनौ एक्सप्रेस (आठवडी)
६१) करिमनगर-तिरुपती एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पेडापल्ली
६२ आनंदविहार-आझमगड एक्सप्रेस (आठवडी) मार्गे मुगलसराय, पुरुलिया
६३) बराकपूर-आझमगड एक्सप्रेस (आठवडी) मार्गे झाझा, बालिया, मऊ
६४) इंदूर-रेवा एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे बिना
६५) जबलपूर-हजरत निझामुद्दीन या दरम्यान स्वतंत्र गाडी
६६) दरभंगा-अजमेर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे रक्सौल, सीतापूर, बरेली, कासगंज, मथुरा
६७) सोलापूर-यशवंतपूर एक्सप्रेस (आठवड्यातून तीनवेळा) मार्गे गुलबर्गा
६८) चेन्नई-पुरी एक्सप्रेस (आठवडी)
६९) हैदराबाद-अजमेर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे मनमाड, इटारसी, रतलाम
७०) आसनसोल-चेन्नई एक्सप्रेस (आठवडी) मार्गे पुरुलिया, संभलपूर
७१) शालिमार-भुज एक्सप्रेस (आठवडी) मार्गे बिलासपूर, कटनी, भोपाळ
७२) अमृतसर-हजूरसाहिब नांदेड एक्सप्रेस (आठवडी)
७३) सांत्रागाछी-अजमेर एक्सप्रेस (आठवडी) मार्गे खडगपूर, चांडिल, बारकाकाना, कोटा, कातनी
७४) माल्दा शहर-सुरत एक्सप्रेस (आठवडी) मार्गे रामपूर हाट, आसनसोल, नागपूर
७५) द्वारका-सोमनाथ एक्सप्रेस (दररोज)
पॅसेंजर गाड्या
१) कोडरमा-नवाडिह (सहा दिवस)
२) श्रीगंगापूर-सुरतगड (दररोज)
३) येरागुटला-नोसाम/नानगानापल्ली (दररोज)
४) विल्लुपुरम्-काटपाटी (दररोज)
५) गुनूपूर-पालसा (दररोज)
६) अजमेर-पुष्कर (पाच दिवस)
७) कोटा-झालावाड शहर (दररोज)
८) बरेली-कासगंच (दररोज)
९) आनंदनगर-बाराहानी (दररोज)
१०) रंगैय्या-तेजपूर (दररोज)
११) म्हैसूर-श्रवणबेळगोळ (दररोज)
१२) जोधपूर-बिलारा (दररोज)
१४) विल्लूपुरम्-मायीलादुथुराई (दररोज)
१५) रोहतक-पानीपत (दररोज)
१६) मिरज-कुरुडवाडी (दररोज)
१७) फुलेरा-रेवारी (दररोज)
१८) म्हैसूर-चामराजनगर (दररोज)
१९) गोरखपूर-सिवान (दररोज)
२०) रेवा-बिलासपूर आणि रेवा-चिरमिरी स्वतंत्र गाडी (दररोज)
२१) म्हैसूर-बिरूर (दररोज)
२२) झॉंसी-टिकमगड (दररोज)