राष्ट्रीय पुरस्कारावर विद्याची मोहोर
मुंबई, (७ मार्च) - ५९ व्या राष्ट्रीय पुरस्काराची दिल्लीत घोषणा करण्यात आली आहे. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटासाठी सर्वोष्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विद्या बालनला देण्यात येणार आहे.
याआधीही विद्या बालनला या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर, स्क्रिन अवॉर्डस्, झी सिने अवॉर्ड या पुरस्कारांमध्ये सर्वोष्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षांत विद्याला ‘पा’, ‘इश्किया’, ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटांसाठी मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आता ‘डर्टी पिक्चर’ मधील सिल्कच्या भूमिकेसाठी तिने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेली आहे.