dailyvideo

.

नाशकात मनसेचा ‘वाघ’

    उपमहापौरपदी भाजपाचे कुळकर्णी -
    मुंबई - नाशिक महानगर पालिकेतील आज घेण्यात आलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यतिन वाघ भाजपाच्या पाठिंब्याने महापौरपदी निवडून आले. त्याचप्रमाणे, उपमहापौर पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाचे सतीश कुळकर्णी हे विजयी झाले. यतिन वाघ यांच्या रूपात मनसेने महाराष्ट्रात आपला पहिलाच महापौर निवडून आणला आहे.
    ठाण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर, नाशिकमध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा मागावा, अशी शिवसेनेची इच्छा होती. पण, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, शिवसेनेनेच विवेकबुद्धीने आपला निर्णय घ्यावा, अशी भूमिका वारंवार विशद केली होती. त्यामुळे शिवसेना नेत्यांची मने दुखावली गेली होती.
    नाशिक महापालिकेत ४० सदस्य असलेल्या मनसेला अखेर १४ नगरसेवक असलेल्या भाजपाने मदतीचा हात दिला. महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे यतिन वाघ यांना ५४ मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असलेले माकपचे तानाजी जायभावे यांना केवळ तीन मते मिळाली. कॉंगे्रस, राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. तर शिवसेनेने सभात्याग केला.
    महापौरपदासाठी मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्यानंतर, मनसेने भाजपाला उपमहापौरपद दिले. या पदासाठी भाजपो सतीश कुळकर्णी यांना उमेदवारी दिली आणि कुळकर्णी यांना विजयी घोषित करण्यात आले.
    दरम्यान, भाजपाने मनसेला पाठिंबा दिल्याने शिवसेना-भाजपा युतीत वाद उङ्गाळून आला आहे. भाजपाने युतीधर्म पाळला नाही, असा आरोप शिवसेनेने केला. तर, शिवसेनेने आम्हाला युतीधर्म शिकवू नये, असा टोला भाजपाने हाणला.

Posted by Admin on 4:26 PM. Filed under , , . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for नाशकात मनसेचा ‘वाघ’

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery