तरूणपिढी भरकटल्याने शहरात तंटे - आर. आर.
औरंगाबाद, दि.१९ मार्च (हिं. स.) - मार्गदर्शनाआभावी तरूण पिढी भरकटत चालली असून त्यामुळे संघर्ष वाढतो आहे असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे महात्मा गांधी शहर तंटामुक्ती अभियानाचे उद्घाटन करताना काढले. यावेळी आ. एम. एम. शेख, आमदार सतीश चव्हाण, महापौर अनिता घोडेले, पोलिस आयुक्त संजयकुमार आदी उपस्थित होते.
प्रायोगिक तत्त्वावर शहरातही राबविण्यात येणार्या तंटामुक्ती अभियानाचे आज आर. आर. पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. तंटामुक्ती अभियानाचा प्रयोग ग्रामीण भागात चांगलाच यशस्वी झाला असून आपले संघर्ष सामोपचाराने आपल्या स्तरावर मिटविण्याचा भारतीय व्यक्तीचा स्वभाव असल्याने या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता शहरातही हे अभियान राबविण्याचा ्रिनर्णय सरकारने घेतला आहे.
तरूण पीढीला योग्य मागंदर्शन मिळत नसल्याने तरूण पीढी भरकटत चालली आहे. अनेक समस्या आणि संघर्ष त्यामुळेच होत असल्याची खंत आर. आर. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सुनीता साळुंके ठाकरे, पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलिय उपायुक्त सोमनाथ घार्गे, जय जाधव आदी उपस्थित होते.