कॉंग्रेसची पडझड, शेअर बाजारात घसरण
मुंबई, (६ मार्च) - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तारूढ कॉंग्रेस पक्षांची चांगलीच वाताहत झाल्याने, हा पक्ष आर्थिक विकासाला खरंच गती देऊ शकेल काय, या चिंतेने मुंबईच्या शेअर बाजाराला ग्रासले आणि गुंतवणूकदारांनी केवळ नफा कमविण्यावरच भर दिला. याची परिणती शेअर बाजाराच्या निर्देशांकात १९० अंकांची घसरण होण्यात झाली.
३० कंपन्यांवर आधारित मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक एकीकडे निकाल जाहीर होत असताना १७,६९१.९६ अंकापर्यंत वर आणि १७,१२८.२८ अंकांपर्यंत खाली आला होता. अखेर मणिपूर वगळता इतर चारही राज्यांमध्ये कॉंग्रेसची वाताहत झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आणि शेअर बाजारात १८९.५८ अंकांची घसरण होऊन तो १७,१७३.२९ अंकांवर बंद झाला.
त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्या निफ्टी निर्देशांकातही ५७.९५ अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या उलाढालीत त्याने ५३८२.०५ असा उच्चांक गाठल्यानंतर बाजार बंद होतेवेळी तो ५२२२.४० अंकांवर स्थिरावला.