dailyvideo

.

सोने, चांदी वधारली

मुंबई, (९ मार्च) - जागतिक बाजारात आलेल्या स्थिरततेमुळे स्थानिक बाजारात गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांनी खरेदीवर भर दिल्याने आणि उद्योगांकडूनही उचल वाढल्याने मुंबईच्या सराफा बाजारात आज सोने व चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झाली.
    स्टॅण्डर्ड सोन्याच्या प्रतितोळा भावात ८० रुपयांची वाढ झाली. बुधवारी २७,६८० रुपये असलेला हा भाव आज २७,७६० रुपयांवर स्थिरावला. त्याचप्रमाणे, शुद्ध सोन्याच्या किमतीत ८५ रुपयांची वाढ झाल्याने, हा भाव बुधवारच्या २७,८०५ रुपयांवरून आज २७,८९० रुपयांवर बंद झाला.
    चांदीच्या प्रति किलो किमतीतही ६५० रुपयांनी वाढ झाली. बुधवारी चांदीचा भाव ५७,५२० रुपये इतका होता. आज तो ५८,१७० रुपयांवर स्थिरावला.
    दिल्लीच्या सराफा बाजारात मात्र, सोन्याच्या किमतीत २५ रुपयांची घसरण झाल्याने येथे हा भाव २८,१२६५ रुपयांपर्यंत खाली आला. तथापि, चांदीच्या प्रति किलो भावात २०० रुपयांची वाढ होऊन तो ५८ हजार रुपयांवर स्थिरावला.

Posted by Admin on 9:10 AM. Filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0

0 comments for सोने, चांदी वधारली

Leave comment

Recent Entries

Recent Comments

Photo Gallery