सीआरआर दरात ०.७५ टक्के कपात
मुंबई, (९ मार्च) - महागाईचा दर कमी झाल्यानंतर आर्थिक स्थिती आणखी सुलभ करण्याच्या दिशेने प्रथमच पाऊल उचलताना, भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर)च्या दरात ०.७५ टक्क्यांनी कपात केली. या निर्णयामुळे ठेवीदार बँकाना रिझर्व्ह बँकेकडे ०.७५ टक्के इतका निधी जमा करणे आवश्यक राहणार असून, यामुळे अर्थव्यवस्थेत ४८ हजार कोटी रुपयांचा प्रवाह येणार आहे.
आतापर्यंत ५.५ टक्के असा आरआरआरचा दर होता. तो आता ४.७५ टक्के इतका करण्यात आला आहे. हा निर्णय बँकींग व्यवस्थेत ४८ हजार कोटी रुपये आणण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे, असे रिझर्व्ह बँकेने जारी केेलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सीआरआरमध्ये कपात करण्याचा हा निर्णय उद्या शनिवारपासून अंमलात आणण्यात येणार आहे. आर्थिक तूट करण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे. अग्रीम करामुळे मार्चच्या दुसर्या आठवड्यात आर्थिक तुटीचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असे निवेदनात म्हटले आहे. अग्रीम कर जमा करण्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे.
यापूर्वी, २४ जानेवारी रोजी बँकेने आपल्या सीआरआरच्या दरात ०.५ टक्क्याने कपात केली होती. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत ३२ हजार कोटींचा निधी आला होता. आता यात आणखी ४८ हजार कोटी रुपयांची भर पडणार असल्याने रिझर्व्ह बँकेने अवघ्या तीन महिन्यात ८० हजार कोटी रुपये अर्थव्यवस्थेत आणले आहेत.